Belagavi

जैन युवा संघटनेच्या वतीने शांतीसागर संस्कार बंधन शिबिराचा बेळगावात प्रारंभ

Share

बेळगावातल्या बसवन गल्लीतील नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरात जैन युवा संघटनेने आयोजित केलेल्या 10 दिवसीय आचार्य श्री शांतीसागर संस्कार बंधन शिबिराला गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

या वर्षी हे शिबिर चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. माजी आमदार संजय पाटील यांनी श्री शांतीसागर महाराजांची पूजा करून शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत शेकडो श्रावक-श्राविकांनी सहभाग घेतला होता. बसवन गल्लीतून निघालेली ही मिरवणूक टिळक चौक, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, केरी गल्ली, मठ गल्ली, कलमठ रस्ता, जुना पी.बी. रस्ता आणि भरतेश शिक्षण संस्थेच्या मार्गाने जाऊन, कोट आवारातील कमल बसदी येथे समाप्त झाली.

या कार्यक्रमात राजू जक्कनवर, राजशेखर बेडिगेरी, अशोक बेडिगेरी, सुनील हणमण्णवर, विनोद दोड्डण्णवर, श्रीपाल केमलापुरे, विनोद गोट्टडगी, सुनील चौगुले, अप्पासाहेब चौगुले, सुनील डी. चौगुले, मोहन बक्केडी, हिराचंद कलमनी, सन्मती कस्तूरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: