Vijayapura

घर कोसळलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबीयांची माजी आम. नडहळ्ळींनी केली विचारपूस

Share

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यात येणाऱ्या अरेमुराळ गावात मुसळधार पावसामुळे एक घर कोसळून चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये रुद्रप्पा बंडिवड्डर, मल्लम्मा बंडिवड्डर, शारदा बंडिवड्डर आणि रुशांत बंडिवड्डर यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत घरातील बहुतांश साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना मध्यरात्री घडली असून, आतापर्यंत ग्रामपंचायत किंवा महसूल विभागातील एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य भाजप मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत रेशनचे वाटप केले. तसेच, अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Tags: