Belagavi

‘मराठा युवक संघा’तर्फे १३ सप्टेंबरपासून आंतरशालेय जलतरण स्पर्धा

Share

मराठा युवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ २० व्या भव्य आंतरशालेय व आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा युवक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.

या स्पर्धा १३ आणि १४ सप्टेंबर रोजी गोवेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात होतील, असेही बैठकीत ठरले. मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी हा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्वांनी मंजुरी दिली. संघाचे सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी सांगितले की, या स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक उत्कृष्ट जलतरणपटू सहभागी होणार आहेत. त्यांनी बेळगावातील सर्व शाळांच्या जलतरणपटूंना मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले. अधिक माहितीसाठी जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला मराठा युवक संघाचे पदाधिकारी शिवाजीराव हंगीरगेकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, शेखर हांडे आणि जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार उपस्थित होते.

Tags: