Dharwad

धारवाड : पीक विम्याच्या नियमात बदल करण्याची मागणी

Share

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गेल्या दहा वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही. या योजनेत बदल करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते शंकर अंबली यांनी केली आहे.

धारवाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यापूर्वीही पीक नष्ट झाल्याने सरकार योग्य ती नुकसानभरपाई देण्यास अपयशी ठरले होते. पंतप्रधान फसल विमा योजनेत गेल्या 10 वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही. तेच जुने नियम आजही सुरू आहेत. ‘चुकीच्या ‘ पद्धतीने केवळ एकाच तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करण्याची पद्धत आजही सुरू आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. ही पद्धत तात्काळ बंद करावी. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ नियम 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. भाव वाढ जास्त झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने धोरण निश्चितीचा विचार केला पाहिजे. आजच्या महागाईनुसार नियमांमध्ये बदल करायला हवा. शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाई देण्याचे काम झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

Tags: