Belagavi

करिकट्टी गावात दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन

Share

करिकट्टी गावातील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत ३०.१६ लाख रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या दोन अतिरिक्त वर्गखोल्यांच्या कामाचे गुरुवारी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, ग्रामीण भागात शिक्षणाला पूर्वीपासून प्राधान्य दिले जात नाही, म्हणूनच आमदार झाल्यानंतर शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याला मी पहिले प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, हे माझे ध्येय आहे. प्रत्येक गावात आवश्यक तेवढ्या वर्गखोल्या, शैक्षणिक साहित्य आणि इतर सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. कोणत्याही कारणास्तव मुलांनी शाळा सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी आंजनेय, चनबस्सू धरनट्टी, यल्लप्पा करडिगुद्दी, दुरगप्पा दासनट्टी, रमेश कपरट्टी, सिदरु कपरट्टी, तुकाराम करडिगुद्दी, यल्लप्पा धरनट्टी, यल्लप्पा नायक आणि सिदरु कपरट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: