Belagavi

क्रांती महिला मंडळ, उमा संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

Share

मुलांमध्ये प्राथमिक स्तरावरच देशभक्तीची भावना रुजवून त्यांना देशाचे आदर्श नागरिक बनवण्याची जबाबदारी पालकांची आहे, असे मत ‘स्फूर्ती विकास संस्थे’चे अध्यक्ष आणि माजी सैनिक संतोष मठपती यांनी व्यक्त केले.

हिंदवाडी येथील ‘गोमटेश विद्यापीठा’त क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.

यावेळी बोलताना मठपती पुढे म्हणाले, ‘मुलांमध्ये शिस्त, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना शिकवण दिली पाहिजे. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे हे आपले कर्तव्य आहे, हाच त्यांना खरा सन्मान ठरेल आणि प्रत्येकाने याचे पालन केले पाहिजे.’ कार्यक्रमादरम्यान, हर्षा आश्रमातील मुलांनी आणि मंडळाच्या सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यावेळी नगरसेवक राजू कृष्णा मेत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा मंगला मठद यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. भारती रत्नाप्पागोळ यांनी प्रास्ताविक केले. राणी जंती यांनी ईशस्तवन तर वसुंधरा देशणूर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, वाणी कारेकर यांनी सूत्रसंचालन केले. रेश्मा दिवटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Tags: