Vijayapura

विजापूरमध्ये पोलिसांनी घेतली ‘राऊडींची परेड’

Share

विजापूर जिल्ह्यात आगामी सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी आठ ‘राऊडी-शिटर्स’ना वेगवेगळ्या जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

विजापूर जिल्हा जातीय सलोख्यासाठी ओळखला जातो. जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राऊडी-शिटर्सची परेड घेऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विजापूर जिल्ह्यात १,२१२ राऊडी आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, शस्त्र बाळगणे, दंगल आणि हल्ला यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या २७ राऊडींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यापैकी आठ राऊडींना हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निंबरगी यांनी दिली आहे. तसेच, रविवारी गोलगुंबाज पोलीस ठाण्याच्या परिसरात ‘राऊडी परेड’ घेऊन त्यांना इशाराही देण्यात आला.

पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले की, “जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी २७ राऊडी-शिटर्सना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १,२१२ राऊडी-शिटर्स असून, ४०० हून अधिक गुंड आहेत. त्यापैकी सध्या २७ राऊडी-शिटर्सची यादी तयार करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.” यामध्ये रवी बाडगंडी, महम्मद हनीफ बागवान, रवी नंदी, महम्मद साजीद सत्तर, जमीर मुल्ला, हनमंतप्पा हळ्ळी, चेतन जत्ती आणि यमनप्पा कट्टीमणी यांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे. एकंदरीत, शांततापूर्ण सण साजरे करण्यासाठी पोलिसांनी घेतलेला हद्दपारीचा निर्णय एक स्वागतार्ह पाऊल आहे.

Tags: