Belagavi

बेळगावच्या शनि मंदिरात श्रावणातील शेवटच्या शनिवारी भाविकांची गर्दी

Share

श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आज सूर्यपुत्र श्री शनेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते.

श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी आज बेळगावच्या पाटील गल्लीतील श्री शनेश्वराच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. श्रावण महिन्याचा शेवटचा शनिवार असल्यामुळे सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मंदिरात आलेल्या भाविकांनी शनीदेवाला तिळाचा दिवा लावून विशेष पूजा केली आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. या दिवशी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने सर्व व्यवस्था केली होती.

या वर्षी श्रावण महिन्यात शनीदेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याचे पाहायला मिळाले.

Tags: