तीन वेगवेगळ्या अमली पदार्थ सेवन प्रकरणात बेळगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

बेळगाव मधील महांतेष नगर येथील रागा हॉटेलजवळ संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या श्रीकांत यक्कुंडी नामक व्यक्तीला पीएसआय होन्नप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, केंद्रीय बसस्थानकाच्या सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या मेहबूब देसाई याला मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हवण्णवर आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यानेही अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशाच प्रकारे, बेळगावमधील आर.पी.डी. रस्त्यावरील जेल शाळेजवळ सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या शंकर कांबळे आणि किशन जंतिकट्टी यांना ताब्यात घेण्यात आले. शहापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकांत पुजारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी गांजाचे सेवन केल्याचे समोर आले. या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.


Recent Comments