आपल्या आईच्या स्मरणार्थ एका तरुणाने आपल्या गावातील सरकारी रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर आणि आवश्यक उपकरणे भेट दिली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील कळकेरी गावात घडली आहे.

कळकेरी गावातील रहिवासी सुधाकर याने आपली आई गंगामा यांच्या स्मरणार्थ हा ऑक्सिजन सिलेंडर भेट दिला आहे. त्याच्या गावातील कळकेरी सामुदायिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता असल्याचे त्याला समजले. त्याने सरकारकडे मागणी न करता, स्वतःच २० हजार रुपये किमतीचा ऑक्सिजन सिलेंडर आणि उपकरणे भेट म्हणून देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


Recent Comments