बेळगावमधील स्फूर्ती सोशल वेलफेअर असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि लक्ष्मी पूजेनिमित्त महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योती आर. भाविकट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. उद्घाटन नारायण वि. बरमणी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) कृष्णा भट्ट, विश्व हिंदू परिषदेचे सामाजिक सामंजस्य प्रमुख आणि रोहिणी बाबासाहेब पाटील, केपीसीसी, बेंगळुरू यांचा समावेश होता. स्फूर्ती सोशल वेलफेअर असोसिएशनच्या सचिव रेश्मा नेरता यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या सोहळ्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने समितीच्या सदस्यांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर नम्रता जहागीरदार यांनी भक्तिगीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. उपाध्यक्ष लता करडीगुद्दी यांच्यासह गीता मल्लापूर, प्रेमा देशानूर, उषा शेट्टर, अंजना हिरेमठ, सविता कळसण्णवर, अश्विनी पाटील आणि निशा रोंद या संचालकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. श्वेता पाटील आणि अनिता चट्टेरा या असोसिएशनच्या संस्थापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपाहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. महांतेश नगर येथील महांत भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला सदस्या उपस्थित होत्या.


Recent Comments