बेळगाव शहरातील बी. शंकरानंद मार्गावर असलेल्या केंद्रीय जीएसटी कार्यालयाच्या बाजूला आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड मुसळधार पावसामुळे उन्मळून पडले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पावसामुळे रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments