Belagavi

खळाळणाऱ्या नदीच्या प्रवाहातून बाईक चालवण्याचा अतिउत्साह नडला

Share

मलप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. याच खळखळून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा अंदाज न घेता, एका बाईकस्वाराने पुराच्या पाण्यातून आपली बाईक नेण्याचा धोकादायक प्रयत्न केला.

बेळगाव जिल्ह्यातील सुरेबान-बिन्नूर गावात मलप्रभा नदीवरील पुलावरून हा अतिउत्साही तरुण बाईक चालवत होता. नदीला मोठा पूर आला असून, पाण्याची पातळी वाढल्याने पूल पाण्याखाली गेला होता. स्थानिक लोकांनी त्याला पुढे न जाण्याविषयी ओरडून सांगितले मात्र याकडे दुर्लक्ष करत बाईकस्वार आततायीपणाने बाईक घेऊन पाण्यात उतरला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तोल जाऊन बाईक घसरली आणि तो वाहून जाण्यापासून थोडक्यात बचावला आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Tags: