बेळगाव जिल्ह्यातील बिजागर्णी ग्रामपंचायत इमारतीला आता एक नवा आणि आकर्षक लुक मिळणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे इमारतीच्या परिसरात उद्यान आणि इतर सुशोभीकरण कामांसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या उद्यानामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, बसण्यासाठी बाकडे, कारंजे आणि मुलांसाठी आधुनिक खेळाचे साहित्य बसवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीची इमारत अधिक सुंदर दिसेल, असे मत उपसरपंच नामदेव मोरे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर असे सुशोभीकरण असलेली ही पहिलीच इमारत ठरेल, ज्यामुळे बिजागर्णीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. लवकरच या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार असल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
या भूमीपूजन सोहळ्याला ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नायक, माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर, महेश पाटील, शीतल तारीहाळकर, चंद्रभागा जाधव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments