बेळगावात समाजकल्याण, मागासवर्गीय कल्याण आणि अल्पसंख्याक विभागांतर्गत येणाऱ्या विविध वसतिगृहांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

सरकार आणि कामगार विभागाने लागू केलेल्या किमान वेतनासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करत सोमवारी बेळगाव जिल्हा सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळा कंत्राटी कर्मचारी जिल्हा युनिटच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये स्वयंपाकी, स्वयंपाकी सहायक आणि रात्रीचे चौकीदार सहभागी झाले होते. किमान वेतन ३६ हजार रुपये करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरक्षा असावी, अशा अनेक मागण्या घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले.
कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दळवाई म्हणाले, “२०१२ पासून आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.” जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी लागमप्पा हरिजन, राजू म्यारेन्नवर, शांतप्पा काळिंगे, कल्पना कुरविर, रमेश भजंत्री, मनोजकुमार सुनगार, मंथन कोलकार यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments