Vijayapura

विजापूर: पोलीस ठाण्यातूनच आमदार यत्नाळ यांना मुस्लिम महिलेची धमकी

Share

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्यावरून वादंग सुरु असून आलमेल शहरात एका कार्यक्रमासाठी आलेले आमदार यत्नाळ यांच्या ताफ्याला मुस्लिम तरुणांनी काळे झेंडे दाखवून विरोध केला.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलक तरुणांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणांचे कुटुंबीय आणि मुस्लिम समाजातील इतर सदस्य पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. याचवेळी एका मुस्लिम महिलेने पोलिसांसमोरच आमदार यत्नाळ यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही महिला विजापूर जिल्हा एआयएमआयएम अध्यक्ष अल्लाबक्ष विजापूर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. ‘यत्नाळचं काम तमाम केलं पाहिजे’, अशी मागणी ही महिला करत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tags: