बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली आहे. कोणाचीही नाराजी न होता, सर्वांना समान न्याय देण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया पार पडली.
आमदार अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. यात कर निर्धारण, वित्त आणि अपील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रेखा मोहन हूगार, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मी महादेव राठोड, नगर नियोजन आणि विकास स्थायी समितीच्या अध्यक्षपदी माधवी राघोचे आणि लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नंदू मिरजकर यांची निवड झाली.
नवनियुक्त अध्यक्षांचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी अभिनंदन केले.


Recent Comments