बेळगाव विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या ‘स्टार एअर’च्या एस5111 या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

विमानांच्या इंजिनमधून पेट्रोलची गळती होत असल्याचे लक्षात आल्यावर पायलटने तात्काळ दक्षता घेत विमान सुरक्षितपणे बेळगाव विमानतळावर परत आणले. या विमानात अजय सुतार, वैष्णव शानभाग, नारायण डेल यांच्यासह एकूण ४१ प्रवासी होते.
विमानाने उड्डाण घेतल्यावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.


Recent Comments