बेळगावच्या अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी महापौर शोभा सोमनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासकीय अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, समिती सदस्य गुरु होसूर आणि माधव पुणेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, सह-मुख्याध्यापिका ऋतुजा जाधव आणि शिशुवाटिकाच्या प्रमुख आशा कुलकर्णी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर मुलांनी भगवद्गीतेचे पठण केले आणि श्रीकृष्णाची भजने गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिंकलेल्या पालकांना बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर मुलांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कृष्ण आणि गोपाळांची वेशभूषा केलेल्या मुलांनी दहीहंडी फोडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमात सुमारे २०० पालकांनी सहभाग घेतला. शांती मंत्राने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.


Recent Comments