धारवाडमधील केलगेरी येथे आज, शनिवारी सकाळी घरात टिनरची बाटली खाली पडून आग लागल्याने एका ४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना केलगेरीमधील संतोष नगर येथे घडली असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मुलाचे नाव अगस्त्य माशाळ असे आहे.

घरातील लोकांनी थंडीपासून बचावासाठी आग पेटवली होती आणि तिच्या बाजूलाच टिनरची बाटली ठेवली होती. खेळता-खेळता अगस्त्य त्या बाटलीच्या जवळ गेला आणि ती बाटली खाली पडली. बाटलीतील टिनरने लगेच आग पकडली आणि ती आग मुलापर्यंत पोहोचली. हे पाहून घरातील लोकांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत मुलाचे अर्धे शरीर भाजले होते. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या वडिलांनाही यामध्ये दुखापत झाली आहे.
दोघांनाही तातडीने किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यात घरातील लोक ओरडत असताना शेजारील लोक मदतीसाठी धावताना दिसत आहेत. जखमी वडिलांवर उपचार सुरू आहेत. ही घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे


Recent Comments