निपाणी येथे झालेल्या अस्मिता तायक्वांदो लीग स्पर्धेत श्रद्धा सूर्यवंशीने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक जिंकले आहे. बेळगावच्या अंगडी इंटरनॅशनल स्कूलची ती नववीची विद्यार्थिनी आहे.

निपाणी येथील गांधी चौकजवळ असलेल्या श्री व्यंकटेश मंदिरात दोन दिवस चाललेल्या २०२५-२६ च्या अस्मिता तायक्वांदो लीग स्पर्धेत श्रद्धाने ४६ किलो वजनी गटात सहभागी होऊन प्रथम स्थान मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.


Recent Comments