Belagavi

बेळगावातील अनगोळ पेठेच्या राजाच्या आगमनासाठी तयारी सुरू

Share

बेळगावमधील अनगोळ येथील रघुनाथ पेठेत शिवनेरी युवक मंडळ आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीचा मुहूर्तमेढ समारंभ पार पडला.

यावर्षी मंडळाचा १६१ वा गणेशोत्सव साजरा होत असून, नेहमीप्रमाणेच गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू असलेल्या अनगोळ पेठेच्या राजासाठी विशेष सेवा आणि जिवंत देखावे सादर केले जाणार आहेत.

यावेळी शिवनेरी युवक मंडळ आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: