१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन तसेच क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर, हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ आणि गोटूर येथील तरुणांनी रायण्णा यांच्या समाधी स्थळ असलेल्या नंदगड येथून ‘क्रांती ज्योत यात्रा’ काढली आहे.

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर जवळील हेब्बाळ आणि गोटूर येथील तरुण रायण्णा यांच्या समाधी स्थळ असलेल्या खानापूर तालुक्यातील नंदगड येथे पोहोचले. त्यांनी क्रांती ज्योत घेऊन ही यात्रा सुरू केली. आज ही ज्योत बेळगावच्या राणी चेन्नम्मा चौकात आणून देशभक्तीच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संतोष नावाच्या एका तरुणाने सांगितले की, “रायण्णा यांच्यामधील देशभक्ती आजच्या तरुणांमध्येही निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी नंदगड येथून क्रांती ज्योत आणली जाते.”
यावेळी हेब्बाळ आणि गोटूर येथील मोठ्या संख्येने तरुणांनी यात्रेत सहभाग घेतला होता.


Recent Comments