बेळगाव मधील शासकीय महिला महाविद्यालयाच्या सभागृहात विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटक साहित्य अकादमी, बेळगावचा चकोर साहित्य विचार मंच, शासकीय महिला महाविद्यालय तसेच कॉलेजचा आय.क्यू.ए.सी. विभाग आणि कन्नड विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कर्नाटक साहित्य अकादमीच्या सदस्य मैत्रेयिणी गदिगेप्पगौडर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, ब्रिटिशांच्या दृष्टीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणे म्हणजे ‘देशद्रोही’ असणे होते. या देशात भगतसिंग यांच्यापासून ते संगोळी रायण्णा यांच्यापर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यलढा दिला. स्वातंत्र्यसंग्रामात अंदमान-निकोबार तुरुंगातील काळ्यापाण्याची शिक्षा सोसणारे पहिले व्यक्ती बेळगावचे होते. भारताच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यात बेळगाव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शासकीय महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. आर. पाटील, य. रू. पाटील, डॉ. बसम्मा गंगन्नहळ्ळी, डॉ. जयशीला जी., शिवराज आरळी, करियप्पा एन., एल. एन. मुकुंदराज यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


Recent Comments