आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनी धारवाडमध्ये सुरू केलेले अहोरात्र धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू असून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ए. आय. यू. टी. यू. सी. या संघटनेच्या नेतृत्वाखाली आशा कार्यकर्त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. ‘मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले मानधन आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेसह दरमहा किमान १० हजार रुपये द्यावेत’, अशा प्रमुख मागण्यांसह हे आंदोलन सुरु आहे. जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर हे अहोरात्र धरणे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे


Recent Comments