चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेले अभिनेता दर्शन, पवित्रा गौडा आणि इतरांना उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा, या मागणीसाठी कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह ७ आरोपींचा जामीन रद्द करण्यात आला आहे.

चित्रदुर्गच्या रेणुकास्वामीच्या हत्येनंतर ११ जून २०२४ रोजी अभिनेता दर्शन, पवित्रा गौडा यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. हत्याकांडाचा आरोप असलेल्या दर्शन आणि त्याच्या साथीदारांना अनेक महिने तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणांवर जामीन मिळाला होता. हा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणात लोकप्रिय अभिनेता दर्शन थुगुदीपा यांना दिलेला जामीन रद्द करण्याची कर्नाटक सरकारने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.
जनप्रियता, अधिकार किंवा इतर कोणत्याही सुविधा काहीही असो, कायद्यासमोर सर्व समान आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश रद्द करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे. बी. परदीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला आहे. यामुळे दर्शन पुन्हा तुरुंगात जाणार आहे. अभिनेता दर्शनसोबत पवित्रा गौडा, ए६ जगदीश उर्फ जग्गा, ए७ अनुकुमार उर्फ अनु, ए१४ प्रदुष, ए११ नागराजू उर्फ नागा, ए१२ लक्ष्मण यांचाही जामीन रद्द करण्यात आला आहे


Recent Comments