माणसाचे शेवटचे विश्रांतीस्थान मानली जाणारी स्मशानभूमी अनेकदा दुर्लक्षित राहते. मात्र, बिजगर्णी गावातील तरुणांनी सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेत गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.

पावसाळ्यात स्मशानभूमीत गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणी येत होत्या. शिवाय, परिसरात कचऱ्याचे ढीग साचले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ब्रह्मा लिंग युवक मंडळ, तिरंगा युवक मंडळ, श्री गणेश भांडी संघ आणि ग्रामपंचायतीने एकत्र येऊन स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबवली.
कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून राबवलेली ही मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. या उपक्रमात मनोहर बेळगावकर, निंगाप्पा जाधव, बबन जाधव, संतोष कांबळे, मनोहर पाटील, परशरम जाधव, रमेश भाषकलं, सागर नाईक, यल्लाप्पा तारिहालकर, रामचंद्र मोरे, अप्पाजी निलजकार, सुनील बचिकार, मोहन सावी, दयानंद बिर्जे, राजू जाधव, गोपाळ बेळगावकर, अशोक तारिहाळकर, भाऊ जाधव, विनोद खांडेकर, चेतन अष्टेकर, सागर जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments