Belagavi

व्यसनमुक्त भारतासाठी बेळगावात जनजागृती रॅली

Share

व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत बेळगावातील सरकारी शिक्षण शिक्षक महाविद्यालय आणि एनसीसी युनिटच्या वतीने आज जनजागृती रॅली काढण्यात आली.

सरकारी शिक्षण शिक्षक महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एनसीसी युनिटच्या माध्यमातून ‘नशा मुक्त भारत’ अभियानाविषयी जागरूकता निर्माण केली आणि सर्व तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा संदेश दिला.

ही रॅली शहरातील विविध रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी व्यसनांचे दुष्परिणाम आणि मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल माहिती देण्यात आली. यासंदर्भात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य एम. आर. अलासे म्हणाले की, “आजच्या काळात अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. अशा परिस्थितीत हे जनजागृतीपर कार्यक्रम समाज परिवर्तनासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.”

Tags: