बेळगावात कायक योगी कोरम भजंत्री समाजाचे शिवशरण नूलिय चंदय्या यांची ९१८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कन्नड आणि संस्कृती विभाग यांच्यासह विविध विभागांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यानिमित्ताने चन्नम्मा चौकातून नूलिय चंदय्या यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मान्यवरांनी ढोल वाजवून मिरवणुकीला सुरुवात केली. या मिरवणुकीत विविध वाद्यमेळांचे कलापथक सहभागी झाले होते.

यावेळी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंतरी, शंकर वाजंत्री, चंद्रशेखर सुखसागरे, मुत्तेप्पा भजंतरी, सुरेश भजंतरी, मारुती भजंतरी, गंगाराम वाजंत्री, यमनप्पा भजंतरी, रामजी भजंतरी यांच्यासह कोरमा भजंतरी समाजाचे अनेक सदस्य उपस्थित होते.


Recent Comments