श्री बाळ गणेश उत्सव मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर
गणेशोत्सवाच्या उत्साहात नार्वेकर गल्लीतील कार्यकर्त्यांनी केली तयारी
आगामी गणेशोत्सवासाठी मंडळाच्या वतीने विधिवत पूजा
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उत्सवासाठी मंडप उभारणीला सुरुवात

बेळगाव : शहापूर येथील नार्वेकर गल्लीतील सार्वजनिक श्री बाळ गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ‘गणाधीश’च्या आगमनासाठी मंडपाची उभारणी करण्याकरिता मुहूर्तमेढ रोवण्यात आला. या सोहळ्यादरम्यान मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली.
यामध्ये सागर पाटील यांची अध्यक्षपदी, विराज मुरकुंबी यांची कार्याध्यक्षपदी, अमित हेरेकर यांची सचिवपदी, तर गौरव अनगोळकर, संदीप हडगल यांची सहसचिवपदी आणि सागर देशपांडे, अमोल काकडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

विधिवत पूजा करून, याच महिन्यात २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक जयंत जाधव, रितेश भोंगाळे, युवराज बेळियाळी, गजानन गावडे, रमेश हडगल, प्रथमेश मिरजकर, प्रशांत भातकांडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments