Belagavi

निट्टूरमधील दलितांवर अन्याय, भीमसेनेसह नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन

Share

निट्टूर ग्रामपंचायत हद्दीतील दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज बेळगावात युवा कर्नाटक भीमसेना आणि युवा शक्ती संघटनेच्या सदस्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.

आज बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात युवा कर्नाटक भीमसेना आणि युवा शक्ती संघटनेच्या सदस्यांनी निट्टूर ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अर्धनग्न आंदोलन केले.

२००७-०८ मध्ये निट्टूर ग्रामपंचायत हद्दीत दलित संघर्ष समितीचे सामुदायिक भवन उभारण्यासाठी जमीन मंजूर झाली होती. परंतु, अजूनही हे भवन बांधले गेलेले नाही. सर्व गावांमध्ये दलित समाजाला सामुदायिक भवन बांधण्यासाठी संधी दिली पाहिजे. सरकारने केवळ थातुरमातुर काम करून दलितांना फसवू नये. दलित स्मशानभूमीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले पाहिजे. तसेच, अनधिकृत शौचालये देखील हटवावीत, अशा विविध मागण्यांसह संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण मादर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले.

Tags: