विजापूर जिल्ह्याला सध्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिकोटा शहरातील एका सरकारी शाळेमध्ये पाणी शिरले असून विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहेत.

तिकोटा शहरातील सरकारी कन्नड मुलींच्या आदर्श शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. या साचलेल्या पाण्यातच विद्यार्थी अभ्यास करण्यास बसले आहेत. शाळेच्या आवारातही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, शालेय साहित्य आणि माध्यान्ह भोजनाचे साहित्यही पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. शाळेत पाणी साचलेले पाहून विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.


Recent Comments