Belagavi

बेळगाव ते बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेसला लवकरच हिरवा झेंडा

Share

बेळगाव-बेंगळूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची बेळगावकऱ्यांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेवेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. याबद्दल खासदार जगदीश शेट्टर यांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार शेट्टर म्हणाले, लोकसभा सदस्य झाल्यापासून बेळगावमधील व्यापारी आणि उद्योजक सतत बेळगाव ते बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी करत होते. याआधी बेंगळुरूहून धारवाडपर्यंत धावणारी रेल्वे बेळगावपर्यंत वाढवताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता रेल्वेमंत्र्यांनी नवीन रेल्वे दिली आहे. त्यामुळे आमच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देऊन पंतप्रधान मोदी १० ऑगस्ट रोजी या सेवेला हिरवा कंदील दाखवत आहेत. ही बाब खूप आनंदाची आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.

Tags: