विजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत एका दुचाकीस्वाराची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली, मात्र तो दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.

विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कल्ल कवठगी-विजापूर रस्त्यावर असलेल्या संगमनाथ मंदिराजवळील नाल्यावर ही घटना घडली. कल्ल कवठगी गावातील श्रीशैल गिडनवर नामक तरुण पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्याची दुचाकी वाहून गेली. सुदैवाने तो तरुण बचावला. सध्या गावकरी नाल्यामध्ये वाहून गेलेल्या दुचाकीचा शोध घेत आहेत. संगमनाथ मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.


Recent Comments