सीमाभागात जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या कन्नड सक्तीला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेतली. या वेळी मराठी भाषकांवरील अन्याय रोखण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले. आमदारांनी या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सीमाभागात चालू असलेल्या कन्नड सक्तीच्या विरोधात आवाज बुलंद करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर केले. बसस्थानक, रुग्णालय व शासकीय कार्यालयांवर मराठी फलक लावावेत, तसेच कन्नड सक्ती तातडीने मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शुभम शेळके यांनी आमदारांना विनंती करत सांगितले की, एका सार्वजनिक कार्यक्रमात कन्नड सक्ती झाल्यामुळे मराठी भाषिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. आपणही मराठी भाषिक असल्यामुळे या मुद्द्याचे गांभीर्य अधिक समजून घ्यावे, असे ते म्हणाले.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदारांना आठवण करून दिले की, खानापूरमधील नव्याने बांधलेल्या शासकीय कार्यालयांवर मराठी फलक लावले गेलेले नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे प्रकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानावर घालावे आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा.
या निवेदनावर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “मी मराठी मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून आलो आहे. कन्नड सक्ती थांबली पाहिजे, याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मी तात्काळ कारवाईची मागणी करणार आहे,” असे ते म्हणाले.
या निवेदनप्रसंगी समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, महादेव पाटील, शिवाजी हावळण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, रमेश माळवी, सचिन गोरले, जोतिबा येळ्ळूरकर, अशोक डोळेकर, प्रतिक गुरव, सचिन दळवी, अशोक घगवे, महेंद्र जाधव, विजय जाधव, सुरुज जाधव, राजू पाटील, प्रवीण पाटील, उमेश पाटील, नीलेश काकतकर, साईराज कुगजी, ज्ञानेश्वर चिकोर्डे, प्रशांत बैलूरकर, अभिषेक कारेकर, शुभम जाधव, रोशन पाटील, श्रीकांत नादूंरकर, शंकर पाखरे, शुभम पाटील, भरत पाटील, किरण पाटील, विनायक सुतार, प्रसाद पाटील, भरमाणी पाखरे, राजू पावळे, रामलिंग चोपडे, जोतिबा चोपडे, वैभव पाटील, प्रशांत पाटील, ओंकार पाखरे, संजय पाटील, विनायक पाटील, मल्लाप्पा मदार, शुभम जाधव, सागर कणबरकर, विनायक हुलजी, सुर्याजी पाटील, प्रतिक देसाई, बळीराम पाटील, साईराज कुगजी यांच्यासह असंख्य मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments