Dharwad

धारवाडमध्ये भाजपच्या बॅनरवरील नेत्याच्या फोटोला काळं फासलं

Share

आमदार अरविंद बेल्लद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपने शहरात लावलेल्या बॅनरवरील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोहम्मदशफी विजापुरी यांच्या फोटोला अज्ञात व्यक्तींनी काळं फासलं आहे.

धारवाड शहरातील अंजुमन कॉलेजसमोरील चौकात आमदार अरविंद बेल्लद यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. शहरात अशाच प्रकारचे अनेक बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर भाजप अल्पसंख्याक मंडळ मोर्चाचे अध्यक्ष मोहम्मदशफी विजापुरी यांचाही फोटो होता. केवळ मोहम्मदशफी यांच्या फोटोला लक्ष्य करून काही समाजकंटकांनी तो काळ्या रंगाने खराब केला. या घटनेनंतर भाजप अल्पसंख्याक मंडळ मोर्चाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags: