Belagavi

शांताई वृद्धाश्रमात डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

Share

माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शांताई सेकंड चाइल्ड’हूड’ या वृद्धाश्रमात डॉ. प्रभाकर कोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचा ठरणाऱ्या ‘सीपीआर’ बाबत जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. यात केएलई नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डमीचा वापर करून उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखवले आणि प्रथमोपचाराचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी बोलताना, माजी महापौर विजय मोरे यांनी डॉ. कोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “सामान्य नागरिकांनीही असे प्रशिक्षण घेऊन गरजेच्या वेळी ते वापरावे, जेणेकरून अनेकांचे प्राण वाचू शकतील.” मोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला नर्मता देवूळकर, त्यांचे कर्मचारी, पीएच्‌सीचे प्रतिनिधी अशोक कोरे, विविध डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, केएलई नर्सिंग आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: