Belagavi

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शालेय साहित्य वाटप

Share

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाव तालुक्यातील तुरमुरी, कल्लेहोळ, कोनेवाडी, बाची, बसरीकट्टी, अष्टे, चंदगड, खणगाव आणि मुचंडी येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये हा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला. या वर्षी या उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून, यंदा बेळगाव, खानापूर आणि निपाणी भागातील सुमारे ३०० शाळांमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

तुरमुरी येथील मराठी सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी अश्वजित चौधरी, निखिल देसाई, महेंद्र जाधव, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष नागेश बेळगावकर, मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते. बाची येथील मराठी सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत श्रीशैल मासेकर, सागर जाधव, निखिल देसाई, मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

मुचंडी , अष्टे, चंदगडआणि खणगाव येथील शाळांमध्येही शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, पदाधिकारी रोहन कुंडेकर, ज्योतिबा पाटील, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

बसरिकट्टी येथील मराठी सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते परशुराम नागरोळी, कुमार शेरेकर, युवराज मुत्तगेकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष कृष्णा कोंडसकोप्पा, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Tags: