भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेेंद्र यांची उचलबांगडी निश्चित असून, राज्याला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची खात्री विजापूर शहर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केली.

विजापूर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यत्नाळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेेंद्र आणि येडियुरप्पा यांचे युग कर्नाटकात संपले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. विजापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेेंद्र यांच्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना यत्नाळ म्हणाले, “मी बाहेर आहे म्हणून विजयेेंद्र यांनी मला निवडले आहे, मी आत असताना ते कधीच आले नाहीत. विजयेेंद्र यांचे काम संपले आहे.”
प्रदेश भाजप अध्यक्ष निवडीला विलंब होत असल्याबद्दल विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “याचा अर्थ अध्यक्षांमध्ये बदल होणार आहे. आतापर्यंत अध्यक्ष नेमला असता. एवढा बलवान हायकमांड असतानाही अध्यक्षपदाची निवड होत नसेल, तर याचा अर्थ मोठा विरोध आहे. विजयेेंद्र यांचा दुराग्रह, आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या बनावट सहीमुळे खर्गे आणि डी.के. शिवकुमार यांच्या ब्लॅकमेलिंगमुळे भाजपला आंदोलन करता येत नाहीये,” असा आरोप त्यांनी केला. प्रदेशाध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा प्रयत्न करत असून, त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना “सोमण्णा हे प्रबळ दावेदार आहेत. ते प्रदेशाध्यक्षपदासाठीच भेटले होते असे म्हणता येणार नाही, ते इतर कामांसाठीही भेटले असावेत.” अशी प्रतिक्रिया दिली.


Recent Comments