बेळगाव येथील कणबर्गी इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनच्या वतीने उद्योजकांना ई-खाते देण्याच्या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कणबर्गी इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ई-खाते न मिळाल्याने उद्योजकांना येत असलेल्या समस्यांची माहिती दिली आणि निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना मुख्तार पठाण म्हणाले की, धारवाडसह इतर ठिकाणी ई-खाते दिले जात आहे. मात्र, बेळगावात उद्योजकांना ई-खाते मिळवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. उद्योजकांना भूखंड खरेदी करण्यासाठी किंवा कर्ज मिळवण्यासाठी ई-खाते दिले जात नाहीये. यामुळे उद्योजक संकटात सापडले आहेत. यापूर्वी या संदर्भात बैठक झाली होती आणि ई-खाते देण्याचे आश्वासनही दिले होते. पण, अद्याप ते दिले गेलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून ई-खाते देण्याबाबत पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सुरेश यादव, दीपक गुडगनट्टी यांच्यासह कणबर्गी ऑटो नगरमधील मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.


Recent Comments