Vijayapura

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे टीकास्त्र

Share

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला याबद्दल कोणतीही सविस्तर माहिती नाही, ती त्यांनाच माहीत असेल असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या केंद्रातील सरकारवर टीका केली.

विजापूर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आम्हाला अनेक शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या समस्यांवर, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर किंवा परराष्ट्र धोरणावर बोलण्याची त्यांनी कधीच संधी दिली नाही. जेव्हा आम्ही गरिबांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार किंवा दलितांवरील अत्याचार हे मुद्दे उपस्थित करत होतो, तेव्हा हिंदू-मुस्लिम वाद उगाच सुरू व्हायचे. सरकारला नोटीस देऊन विचारले असता, त्यांनी आम्हाला संधी दिली नाही. आता धनखडच यावर बोलतील. ते आणि मोदी एकत्र आहेत. असे म्हणत खर्गे यांनी आपले वाक्य अपूर्ण सोडले.

केपीसीसी अध्यक्षांच्या बदलाबाबत विचारले असता, खर्गे यांनी “याबद्दल मी आता काहीही बोलणार नाही, नंतर सांगेन,” असे म्हणत टाळाटाळ केली.

Tags: