नुकत्याच बेंगलोर येथील बसवनगुडी जलतरण तलावात संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित जूनियर व सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

कुमार स्वरूप धनुचे याने ग्रुप एक मध्ये 50 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक, कुमारी आरोही चित्रगार हिने ग्रुप तीन मध्ये 100 व 200 मीटर बटरफ्लाय मध्ये रौप्य पदक, कुमार तनुज सिंग ग्रुप एक मध्ये 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कांस्यपदक, कुमारी दिशा होंडी हिने ग्रुप दोन मध्ये 50 व 100 मीटर फ्रीस्टाइल दोन रौप्य पदक, कुमारी निधी मुचंडी ग्रुप तीन 200 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये रौप्य पदक व 100 मीटर बॅक स्ट्रोक कांस्य पदक, कुमारी वेदा खानोलकर ग्रुप एक पन्नास मीटर बटरफ्लाय मध्ये चौथा क्रमांक यांनी विशेष कामगिरी केली.
कुमार स्वरूप धनुचे, व कुमारी आरोही चित्रगार यांची येत्या ऑगस्ट महिन्यात अहमदाबाद येथे ज्युनिअर व बेंगलोर येथे सब ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदन निवड झाली आहे.
वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे एन आय एस प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, सतीश धनुचे यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष श्री शितल हुलभत्ते हे अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.


Recent Comments