महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सीमाभागातील कन्नड सक्तीला विरोध दर्शवत बेळगावच्या ८६५ सीमावर्ती गावांमध्ये कन्नड भाषेची सक्ती रद्द करण्याची मागणी करत म. ए. समितीने जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन दिले.

संपूर्ण कर्नाटकात कन्नड भाषा सक्तीची करण्याला आमचा विरोध नाही, मात्र हा आदेश सीमावादग्रस्त बेळगावमधील ८६५ गावांमध्ये लागू करू नये, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
म. ए. समितीने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर करून, सीमावादग्रस्त बेळगावमधील ८६५ गावे वगळून संपूर्ण कर्नाटकात कन्नड सक्तीचा आदेश लागू करण्याची मागणी केली.
या संदर्भात बोलताना म. ए. समितीचे नेते शुभम शेळके म्हणाले, “बेळगावात कन्नड प्राधिकरणाने सातत्याने बैठका घेऊन येथे १००% कन्नड सक्ती लागू केली आहे. बेळगाव महानगरपालिकेतील फलक आणि महापौर-आयुक्तांच्या वाहनांच्या नंबर प्लेट्सवरही कन्नड भाषेचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण कर्नाटकात कन्नड सक्ती लागू करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, सीमावादग्रस्त असलेल्या ८६५ गावांमध्ये कन्नड सक्ती करणे योग्य नाही. आम्ही यापूर्वीही महापौरांना निवेदन दिले होते आणि आता जिल्हा पालकमंत्र्यांनाही निवेदन सादर केले आहे.”
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदारे, कोषाध्यक्ष व नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, अभिजीत मजुकर, अशोक घगवे, नारायण मुच्चंडिकर, भागोजीराव पाटील, निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, रणजीत हावळाण्णाचे, मोतेश बार्देशकर, सचिन दळवी, गजानन शहापूरकर, सूरज कणबरकर, प्रवीण गौडर, सूरज जाधव, गणेश मोहिते, निलेश काकळकर,
श्रीकांत नादूरकर, राजू नागेश पावले, दीपक लोहार, अनिल देसूरकर, शुभम जाधव, विनायक कांगळे, दीपक गुळेयनवर, अमोल चौगुले, रोहित वायचळ, विशाल सावंत, अभिषेक कारेकर, किरण नार्वेकर, आनंद तुप्पट, अभिषेक तुप्पट, अक्षय पाटील, नागेश सरफ, सूरज जाधव, ज्ञानेश्वर चिकोर्डे, तबरेज मस्केवाले, राहुल देसूरकर, पवन खाडे, शेखर कोडेकर, चेतन अजरकर, दिगंबर कांबळे, बसंत गावदोजी, अनिल घडशी, प्रशांत बैलुकर, प्रवीण पाटील तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments