Belagavi

प्रबंध सादर करून राष्ट्रपतींच्या सन्मानास पात्र ठरलेली उज्वला

Share

कचरा व्यवस्थापनावरील निबंध स्पर्धेत यश मिळवून राज्याला गौरवान्वित केलेल्या महांतेश नगर येथील सरकारी शाळेतील विद्यार्थिनी उज्वला नाझरेचा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सत्कार केला.  २०२३-२४ च्या निबंध स्पर्धेत बेळगावच्या महांतेश नगर येथील सरकारी शाळेतील विद्यार्थिनी उज्वला नाझरेने राज्याचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उज्वलाने कचरा व्यवस्थापनावर आपला निबंध सादर केला होता.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्ष आणि बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी शाळेचे मुख्याध्यापक व एस.डी.एम.सी. सदस्यांसोबत विद्यार्थिनी उज्वलाचा सत्कार केला. उज्वलाच्या या यशामुळे शाळा आणि जिल्ह्यालाही मान मिळाला आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. उप्पार यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

Tags: