बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील ४ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी विशेष प्रयत्न करून, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासनाकडून निधी मिळवला आहे. शनिवारी त्यांनी संबंधित मंदिरांच्या विश्वस्त मंडळांना धनादेश सुपूर्द केले.

यामध्ये भीमगड येथील श्री लक्ष्मी मंदिराला १० लाख रुपये, बेंडिगेरी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला १० लाख रुपये, अरळीकट्टी गावातील श्री बसवेश्वर मंदिराला ६.६६ लाख रुपये, तर कुकडोहळी गावातील श्री कळमेश्वर मंदिराला ३.३३ लाख रुपये असे अनुदान देण्यात आले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आतापर्यंत ग्रामीण मतदारसंघातील १४० हून अधिक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर केला असून, हा एक विक्रम ठरला आहे. यावेळी संबंधित गावांचे ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी जे.बी.भागोजिकोप्पा आणि खासगी सहायक उपस्थित होते.


Recent Comments