बेळगाव शहरातील प्रभाग क्रमांक २९ मधील हिंदवाडी परिसरात, श्री दुर्गादेवी मंदिराच्या नजीक पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रभाग २९ मधील हिंदवाडी परिसरातील श्री दुर्गादेवी मंदिराच्या आसपासच्या भागात नगरसेवक नितीन जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पेव्हर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अभय पाटील यांनी या कामाचे उद्घाटन केले. या विकासकामांमुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी गल्लीतील पंचमंडळीपैकी शिवानंद दंडगल, अशोक शिवरायकर, चवडप्पा बेकवाडकर, रवी दंडगल, राजू बेकवाडकर, मनोज शिवरायकर, श्रीधर बेकवाडकर, श्रीकांत जंतिनकट्टी, सुभाष करगुप्पिकर आणि प्रताप बेकवाडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments