Vijayapura

विजापूर शहरात सूर्याभोवती दिसले इंद्रधनुषी वलय

Share

आपला ग्रह अनेक आश्चर्यांनी भरलेला असून आज विजापूरमध्ये नागरिकांनी सूर्याभोवती एक अद्भुत वलय, अर्थात ‘सन हॅलो’, पाहून आश्चर्य व्यक्त केले. विजापूर शहर आणि आसपासच्या परिसरात हे सूर्यप्रभा मंडल दिसून आले असून सूर्याभोवतीच्या इंद्रधनुषी रंगांच्या तेजोमंडलाने लोकांना थक्क केले.

सूर्याभोवती दिसणाऱ्या या वलयाला “सूर्यप्रभा मंडल” किंवा “सौर प्रभामंडल” असे म्हणतात. वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांवर सूर्यकिरणे पडल्याने प्रकाशाचे अपवर्तन होऊन घडणारी ही एक प्रकाशीय घटना आहे.  हे दृश्य प्रामुख्याने सिरस ढगांमध्ये (सिरस क्लाउड्स) दिसून येते, जे पातळ आणि विरळ ढग असतात. या ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांवर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा प्रकाश अपवर्तित होऊन रंगांमध्ये विभागला जातो, ज्यामुळे वलयासारखी रचना तयार होते.

या घटनेला “२२ अंशांचे प्रभामंडल” असेही म्हणतात, कारण या वलयाची त्रिज्या सूर्याभोवती साधारणतः २२ अंश असते. हा अद्भुत सोहळा पाहून नागरिकांनी तो डोळ्यात साठवून घेतला.

Tags: