वीरशैव लिंगायत पंथातील बेड जंगम समाजाला अधिकृत मान्यता मिळावी आणि संबंधित कागदपत्रे सरकारला सादर करण्यात आल्याचे अखिल कर्नाटक बेड जंगम संघटनेचे नेते वीरूपाक्षय्या नीरलगीमठ यांनी सांगितले. ते बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्नाटक उच्च न्यायालयात बेड जंगम कोण आहेत, यावर सुरू असलेला खटला अंतिम टप्प्यात असल्याने, या विषयावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
२०२१-२२ च्या कायदेशीर विभागाच्या समितीने दिलेल्या अहवालाला सरकारने स्वीकारून, बेड जंगमांना वीरशैव लिंगायत पंथात समाविष्ट करण्याचे आदेश समाज कल्याण विभागाने काढावेत, अशी मागणी नीरलगीमठ यांनी केली. यासंदर्भात सरकारने ५ ऑक्टोबर १९९५ रोजीच एक परिपत्रक काढले असून, राज्यातील सर्व तहसीलदारांनी प्रमाणपत्रे द्यावीत, असे त्यात नमूद केले असल्याचेही ते म्हणाले.
सूर्यनायरायण कामत यांच्या वंशशास्त्रीय अभ्यासातील अहवालातील समस्या विचारात घेऊन, जंगम समाजाच्या घराघरात जाऊन त्यांना प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी शंकरय्या हिरेमठ, चंद्रशेखर सवदि, जी.एस. पाटील, आर.एल. चिक्कदमठ, एम.व्ही. हिरेमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments