Belagavi

बेंगळुरूतील विद्यार्थिनीवरील अत्याचाराविरोधात बेळगावात आंदोलन

Share

बेंगळुरूमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी बेळगावातील विद्यार्थिनींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

बुधवारी बेळगावमधील कित्तूर चन्नम्मा सर्कलजवळ अखिल भारतीय लोकशाही विद्यार्थी संघटना (एआयडीएसओ) च्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींनी आंदोलन केले. बेंगळुरूमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, तसेच शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींना योग्य संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करून धमकावण्यात आले आहे. यात दोन प्राध्यापक आणि त्यांचा एक मित्र सहभागी आहेत. त्यांना कठोर शिक्षा देऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पाऊले उचलावीत, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

एआयडीएसओचे जिल्हा संयोजक महांतेश बिळूर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात अनेक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

Tags: