Banglore

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस ओबीसी सल्लागार समितीची बैठक

Share

बेंगळुरू येथील खाजगी हॉटेल मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली एआयसीसीच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) सल्लागार समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध समस्या आणि इतर संबंधित विषयांवर चर्चा केली जात आहे.

या बैठकीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी,

विधान परिषद सदस्य आणि एआयसीसीचे सरचिटणीस बी.के. हरिप्रसाद, एआयसीसी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद यांच्यासह अनेक सल्लागार समिती सदस्य सहभागी झाले आहेत.

Tags: